Friday, January 14, 2011

Mehendi 1

नमस्कार मित्रांनो, कसा काय गेला तुमचा आजचा दिवस? तर आज मी आपल्या साठी मेहेंदी आणलीये खरी खुरी नाही हो त्याची साधी सोपी डिसाइन. कारण उद्या मकर संक्रांत, आणि माझ्या मैत्रिणी ती साजरी करणारच. म्हणून फक्त माझ्या मैत्रिणी साठी खास माझ्या कडून संक्रांतिची छोटीशी भेट. मला खात्री आहे माझी हि भेट माझ्या मैत्रिन्निना नक्की आवडेल.
     तर मी या साठी बाजारातून तयार मेहेंदिचा कोणच आणला होता. तस आपण घरीही कोण बनवू शकतो पण त्याची जरा मोठी कृति आहे, त्याला वेळ आणि धीर दोन्ही लागतातच .... :-) असो! खाली फोटो मधे दिल्या प्रमाने मी डिसाइन ची सुरवात फक्त छोट्याशा ठिपक्या पासून केलि आहे. आणि त्यावर रेषा ओडून पुडिल डिसाइन काडली. आपल्या भारतीय संस्कृति मधे मेहेंदिचे खुप मोठे स्थान आहे. प्रत्तेक शुभ प्रसंगी मेहेंदी हि आलीच. तस पाहिल तर आपल्या इथे सण वाराला मेहेंदी लावण्याची पध्धत आहे, पण माझ्या बाबतीत असे नहीं. कारण सण नसले तरी मी नेहमी मेहेंदी लावत असते. :-) माला दुसरयाला मेहेंदी लावायला आणि स्वताला पण लावून घ्यायला खुप आवडते. आणि खास गोष्ट म्हणजे माझ्या पतिदेवान्ना पण माझ्या हातावर मेहेंदी खुप आवडते. खर तर मेहेंदी हे सौभाग्याच इक सुन्दर आणि रंगित प्रतिक देखिल आहे. आज काल तर मेहेंदिचे पण अनेक प्रकार आपण पाहतो. त्यातलाच एक छोटा प्रकार मी आज आपल्या साठी आणलाय मला  खात्री आहे तो आपल्या सगळ्यान्ना  आवडेल. तसेच मित्रांनो मी आजच आपल्या सगळ्यान्ना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते.... तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला ...

HAPPY MAKAR SANKRANT ........TIL GUL GHYA GOD GOD BOLA                

No comments:

Post a Comment