 |
Ma Papa |
|
Hello Friends, काय चाललाय ? मी काही दिवसा पूर्वी ना एक फ्रेम बनवली माझ्या माँ पापा साठी. कशी बनली? चांगली आहे ना? मी मागच्या आठवडयात माहेरी गेली होते, दौण्ड ला म्हणून विचार केला की माझ्या कडून माँ पापाना छोटीशी भेट द्यावी. त्यांना खुप आवडली हि भेट. आणि का नाही आवडणार मी बनवली होती ती फ्रेम खास त्यांच्या साठी.
हा फोटो माझ्या माँ पप्पा चा आहे, त्यांनी हा पुण्यातील एका स्टूडियो मधे काडला होता. याची स्टोरी अशी की ते दोघे पप्पा च्या मित्राच्या लग्ना साठी पुण्याला आले होते, त्यांच्या स्वतहाच्या लग्नाच्या काही दिवसा नंतर. तेव्हाचा हा फोटो. किती सुन्दर दिसतात ना दोघ या मधे. माझे पप्पा वकील आहेत आणि मम्मी हाउस वाइफ, पण माझ्या मम्मी च पण शिक्षण खुप आहे बर. मम्मी च M com झालाय आर्ट्स मधे. माझी मम्मी मुळची इन्दोर ची आहे आणि पप्पा दौण्डचेच. आम्ही गुजराथी आहोत. लहानपणी माझे शिक्षण मराठीत झाले म्हणून माझी मराठी चांगली आहे. तसे घरात आम्ही गुजराथी भाषेतच बोलतो.

या फ्रेम साठी मी लाकडी गोल फ्रेम वापरली आहे, आणि त्यावर पर्ल कलर लाउन वर्क केले आहे. यामधे वेग वेगळ्या डबल कलरच्या स्ट्रिप्स वापरून मी हे गुलाब बनविले आहेत. मलाना गुलाब खुपच आवडतात म्हणून विचार केला गुलाबाच्या मदतीने एक फ्रेम बनवली पाहिजे. आणि ती तुमच्या समोर आहे , कशी वाटली ती सांगा हा? चला तर मग लवकरच भेटू एका नव्या कला कृति सोबत तोपरियंत Bye ......