Saturday, January 29, 2011

Socks Doll


Hello Friends, today i am going to show you a socks doll. I made this doll from plain white socks. I made its base using plastic plate, cassette cover and cassette. Other things required are satin ribbon, some flowers, black bindi for eyes and brown bindi for her nose and lips, some golden pearls, pins and thermocol.

  For her cap i used the elastic from socks. I had learned how to make this doll when i was in 10th class. It does not take much time. Try it...

 

Friday, January 28, 2011

My Quilling photo Frame (4)

Good Morning Friends, How are you today?
आज मी आपल्या सगळ्यान्ना माझ्या बालपणाचा फोटो दाखवते हा... ह्या फ्रेम मधे मीच आहे. माझा हा फोटो मी जेव्हा तिसर्या वर्गात होते ना तेव्हा चा आहे. मला लहानपणा पासूनच मेकअप करण्याची खुप आवड आहे. :) हा फोटो माझ्या B'Day च्या दिवशी काडला  होता. मला आजही तो दिवस जसाचा तसा आठवतो, त्या दिवशी मला मम्मी नेच तयार केले होते. फोटो मधे मागच्या बाजूला जी डॉल आहे ती पप्पा नी आणली होती माझ्या B'Day च गिफ्ट. मला ती डॉल खुप आवडायची. कित्तेक वर्ष मी ती जपून ठेवली होती. त्या दिवशी खुप पाहुणे आले होतो घरी, माझे मित्र पप्पांचे मित्र. मम्मी नी स्वत माझ्या साठी केक बनवला होता. खुप छान होता तो दिवस...
Fringed flower  
   मी हि फ्रेम कार्ड बोर्ड वर तयार केलि आहे. त्यावर ब्लू कलरचा जाड कागद लावून डिसाइन काडली आहे, सॉरी त्या कागदाला काय नाव आहे ते मला माहित नाहीये.

Thursday, January 27, 2011

Quilling Photo Frame 3

Ma Papa
Hello Friends, काय चाललाय ? मी काही दिवसा पूर्वी ना एक फ्रेम बनवली माझ्या माँ पापा साठी. कशी बनली? चांगली आहे ना? मी मागच्या आठवडयात माहेरी गेली होते, दौण्ड ला म्हणून विचार केला की माझ्या कडून माँ पापाना छोटीशी भेट द्यावी. त्यांना खुप आवडली हि भेट. आणि का नाही आवडणार मी बनवली होती ती फ्रेम खास त्यांच्या साठी.
  हा फोटो माझ्या माँ पप्पा चा आहे, त्यांनी हा पुण्यातील एका स्टूडियो मधे काडला होता. याची स्टोरी अशी की ते दोघे पप्पा च्या मित्राच्या लग्ना साठी पुण्याला आले होते, त्यांच्या स्वतहाच्या लग्नाच्या काही दिवसा नंतर. तेव्हाचा हा फोटो. किती सुन्दर दिसतात ना दोघ या मधे. माझे पप्पा वकील आहेत आणि मम्मी हाउस वाइफ, पण माझ्या मम्मी च पण शिक्षण खुप आहे बर. मम्मी च M com झालाय आर्ट्स मधे. माझी मम्मी मुळची इन्दोर ची आहे आणि पप्पा दौण्डचेच. आम्ही गुजराथी आहोत. लहानपणी माझे शिक्षण मराठीत झाले म्हणून माझी मराठी चांगली आहे. तसे घरात आम्ही गुजराथी भाषेतच बोलतो.
 या फ्रेम साठी मी लाकडी गोल फ्रेम वापरली आहे, आणि त्यावर पर्ल कलर लाउन वर्क केले आहे. यामधे वेग वेगळ्या डबल कलरच्या स्ट्रिप्स वापरून मी हे गुलाब बनविले आहेत. मलाना गुलाब खुपच आवडतात म्हणून विचार केला गुलाबाच्या मदतीने एक फ्रेम बनवली पाहिजे. आणि ती तुमच्या समोर आहे , कशी वाटली ती सांगा हा? चला तर मग लवकरच भेटू एका नव्या कला कृति सोबत तोपरियंत  Bye ......

Happy Dinosaur

Quilling Dinasaur

Tuesday, January 25, 2011

Table n Chair

"G"od
"O"ffers us
"O"utstanding
"D"evotion
"M"ake us
"O"bedient &
"R"eady for
"N"ew day two
"I"nitiate
"N"ew Aim for the
"G"lory of Life ..... 
 GOOODDDD MORNINGGGG .... :-)

Monday, January 24, 2011

Quilling Tea Set

नमस्कार मंडळी, कस काय ? बर आहे ना ? सॉरी हा मी एक आठावड़ा आपल्या सगळ्यान्ना भेटू नाही शकले. असो! काय मग चाहा पार्टी करायची का ????

चला तर मी आज तुम्हाला माझ्या Quilling च्या Tea Set मधे चाहा देते. कसा झालाय सांगा हं ? मी हा tea set मागच्या शनिवारी बनवला. मी काही tea set चे फोटो पाहिले होते आणि माला ते खुपच आवडले आणि म्हणून मी हि ते बनवण्याचा प्रयत्न केलाय. या साठी मी दोन कलरच्या स्ट्रिप्स वापरल्या आहेत. तसेच मला हा सेट बनवण्या साठी Quilling Coach चा पण वापर करावा लागला. या coach च्या वापरानेच आपण 3d चा इफेक्ट देऊ शकतो. या सेट मधे सात आइटम आहेत. मी या मधे बाऊल आणि चमचा हि बनवला आहे. हा सेट बनवण्या साठी फारसा वेळ नाही लागत नाही. खुप लवकर बनतो. तुम्ही पण try करा आणि मला सांगा कसा बनला ते.

Friday, January 14, 2011

Mehendi 1

नमस्कार मित्रांनो, कसा काय गेला तुमचा आजचा दिवस? तर आज मी आपल्या साठी मेहेंदी आणलीये खरी खुरी नाही हो त्याची साधी सोपी डिसाइन. कारण उद्या मकर संक्रांत, आणि माझ्या मैत्रिणी ती साजरी करणारच. म्हणून फक्त माझ्या मैत्रिणी साठी खास माझ्या कडून संक्रांतिची छोटीशी भेट. मला खात्री आहे माझी हि भेट माझ्या मैत्रिन्निना नक्की आवडेल.
     तर मी या साठी बाजारातून तयार मेहेंदिचा कोणच आणला होता. तस आपण घरीही कोण बनवू शकतो पण त्याची जरा मोठी कृति आहे, त्याला वेळ आणि धीर दोन्ही लागतातच .... :-) असो! खाली फोटो मधे दिल्या प्रमाने मी डिसाइन ची सुरवात फक्त छोट्याशा ठिपक्या पासून केलि आहे. आणि त्यावर रेषा ओडून पुडिल डिसाइन काडली. आपल्या भारतीय संस्कृति मधे मेहेंदिचे खुप मोठे स्थान आहे. प्रत्तेक शुभ प्रसंगी मेहेंदी हि आलीच. तस पाहिल तर आपल्या इथे सण वाराला मेहेंदी लावण्याची पध्धत आहे, पण माझ्या बाबतीत असे नहीं. कारण सण नसले तरी मी नेहमी मेहेंदी लावत असते. :-) माला दुसरयाला मेहेंदी लावायला आणि स्वताला पण लावून घ्यायला खुप आवडते. आणि खास गोष्ट म्हणजे माझ्या पतिदेवान्ना पण माझ्या हातावर मेहेंदी खुप आवडते. खर तर मेहेंदी हे सौभाग्याच इक सुन्दर आणि रंगित प्रतिक देखिल आहे. आज काल तर मेहेंदिचे पण अनेक प्रकार आपण पाहतो. त्यातलाच एक छोटा प्रकार मी आज आपल्या साठी आणलाय मला  खात्री आहे तो आपल्या सगळ्यान्ना  आवडेल. तसेच मित्रांनो मी आजच आपल्या सगळ्यान्ना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते.... तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला ...

HAPPY MAKAR SANKRANT ........TIL GUL GHYA GOD GOD BOLA                

Wednesday, January 12, 2011

Rangoli

Hi, Good Morning मित्रांनो. कसे आहात आपण? तुम्ही विचार करत असल की मी quilling वरून रांगोळी वर कशी काय उडी मारली.... :-) त्याच काय झाल मी माझे काही जुने फोटोस पाहत होते त्या मधे माला काही रांगोळीचे फोटो मिळाले आणि मी विचार केला की माझ्या बाकीच्या कले प्रमाने आपल्याला माझी हि कला देखिल आवडेल आणि म्हणून मी आपल्या साठी काही रांगोळी चे फोटोस आणले आहेत माला खत्री आहे ते आपल्याला आवडतील.
चला तर मग भेटुया इतर कला आणि त्याच्या माहिती बरोबर ..
Bye , Have a nice dayTuesday, January 11, 2011

Quilling photo Frame 2

Hello Friends, मी पुन्हा आले आपल्या सर्वांच्या भेटीला आणि माझी नविन कला कुसर दाखवायला सुधा. आज मी अजुन एक फ्रेम बनवली आहे. फोटोतिल हे सुन्दर बाळ माझ्या माउशीचा मुलगा आहे, ओशो (Osho) आणि हि फ्रेम खास त्याच्या साठी. :)
    या साठी मी आधी सधी लाकडी फ्रेम घेतली व त्यावर Pearl Ivory कलर लावला व ते अर्धा तास वालू दिले. तो पर्यंत मी काही फुलं आणि पाने तयार केलि जी माला त्या फ्रेम साठी आवश्यक होती. या मधे मी काही छोटी तर काही 3D फुलांचा वापर केला आहे.  कारन फ्रेमला चांगला उठाव मिळावा म्हणून. तसेच खाली दिलेल्या फोटो प्रमाणे मी दोन आकाराची पाने वापली आहेत. छोटया फुलां साठी मी पातल स्ट्रिप्स वापरल्या तर मोठया साठी त्यापेक्षा जाड आणि मोठया स्ट्रिप्स वापरल्या आहेत.

  व हे सर्व चांगल्या रितीने पाहण्या साठी या फ्रेमचे वेग वेगळ्या ऐंगल (angle) ने फोटोस घेतले आहेत. पण हो हे फोटोस मी नाही
  घेतले हं, हे सगले तसेच आधीचे पण सर्व फोटोस माझ्या पतिदेवांनी म्हणजे माझ्या hubby न्नी घेतले आहेत. म्हणून माझ्या या कले मधे त्यांची पण खुप मोठी साथ आहे आणि या साठी मी त्यांचे मना पासून  आभार मानते.


   Sunday, January 9, 2011

   Quilling Heart

   मी आधी काही फुलं आणि पानं बनवली होती, पण त्याच काय करू समजत नवत मग मी ती Heart shape मधे अर्रेंज केलि तर हि डिजाईन बनली. :-)

   Qulling Ganesha :-)

   Quilling Ganesha
   Quilling Ganesha

   Vase

   Flower Pots n cactus :)

   हे  pots
     देखिल मी quilling नेच बनवले आहेत व याला 3D quilling असे म्हणतात. पोट च्या मधे मी quilling ची फूल व ग्रीन स्ट्रिप वापरली आहे.